spot_img
Thursday, November 21, 2024
ऑटोEV6 साठी Kia India कडून बुकिंग सुरू; भारतात फक्त 100 युनिट्सची होणार...

EV6 साठी Kia India कडून बुकिंग सुरू; भारतात फक्त 100 युनिट्सची होणार विक्री

spot_img

Kia India कडून भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार मॉडेल EV6 साठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅट्फॉर्म E-GMP वर EV6 बनवण्यात आली आहे. या कारच्या माध्यमातून भारतामध्ये Kia त्यांच्या इलेक्ट्रिक कार्सच्या प्रवासाला सुरूवात करणार आहे.

देशात विकणार फक्त 100 युनिट्स

Kia EV6 चे फक्त 100 युनिट भारतात कम्प्लीटली बिल्ट युनिट (CBU) म्हणून येतील आणि या वर्षापासून देशात या विक्रीसाठी उपलब्ध असतील. ही Imported car पुढील आठवड्यात देशात लॉन्च होणार आहे.

Kia EV6 अशी बुक करा

ग्राहक Kia EV6 फक्त 3 लाख रुपयांच्या टोकन रक्कमेसह बुक करू शकतो. ही इलेक्ट्रिक कार केवळ भारतातील 12 शहरांमधील 15 निवडक डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते. तसेच ही कार ग्राहक किया इंडियाच्या संकेतस्थळाद्वारे देखील बुक करू शकता. किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ Tae-Jin Park यांनी सांगितले की, भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात मोठे बदल होत आहेत. या बदलांमध्ये Kia आघाडीवर आहे. भारतीय नागरिकांच्या अपुर्‍या गरजा पूर्ण करणाऱ्या आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन आणि सेवांद्वारे आम्ही हे वारंवार सिद्ध केले आहे.

Kia EV6 Power आणि Specification

Power आणि Specifications बद्दल बोलायचे झाले तर Kia EV6 सिंगल चार्जवर 528 किमी पर्यंतचे अंतर पार करण्यास सक्षम आहे, असा दावा Kia ने केला आहे. ही इलेक्ट्रिक कार केवळ 5.2 सेकंदात 0-100 किमी / ताशी वेग पकडू शकते. चार्जिंग वेळेबद्दल सांगायचे तर, ही इलेक्ट्रिक कार 350KWh चार्जर वापरून 18 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.

फीचर्स

Kia EV6 ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टिम, पॅनोरामिक सनरूफ, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फॉरवर्ड कोलिजन अव्हायडन्स असिस्ट, लेन कीप असिस्ट सिस्टम आणि 60 हून अधिक कनेक्ट फीचर्स यात देण्यात आले आहेत.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या