spot_img
Thursday, November 21, 2024
अहमदनगर Ahmednagar Newsनगरचे नामांतर नगरकरच ठरवतील; पडळकरांच्या मागणीला खासदार विखेंचा अप्रत्यक्ष छेद

नगरचे नामांतर नगरकरच ठरवतील; पडळकरांच्या मागणीला खासदार विखेंचा अप्रत्यक्ष छेद

spot_img

अहमदनगरच्या नामांतराचा विषय महत्त्वाचा नसून जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. नगरचे नामांतर नगरकर ठरवतील, असे मत व्यक्त करतानाच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वपक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ‘अहिल्यानगर’ नामांतर मागणीची हवाच काढून घेतली. उड्डाणपुलाच्या कॉलमवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपट चित्राच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे.

याकामाच्या प्रारंभाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केल्याकडे लक्ष वेधता, खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म नगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला.

अहमदनगर जिल्हा विभाजनाची गरज नाही
जिल्हा विभाजनचा अनेक दिवसांचा प्रश्न आहे. पण नगरचे विभाजन झाले नाही पाहिजे. एकतेत जिल्ह्याची ताकद आहे. महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे, असेही खासदार डॉ. विखे म्हणाले.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या