महाराष्ट्रातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे ही ऑफर एक महिन्याच्या कालावधी करिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई पॉस प्रणाली द्वारे करण्यात येईल
महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील दिवाळी गोड जावी म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील रेशन धारकांना शिधा व वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ शंभर रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते या पॅकेज मध्ये प्रत्येक रेशन धारकांना प्रति एक किलोच्या परिमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर पामतेल याचा समावेश असेल राज्यातील एक कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ व फायदा होणार आहे हे पॅकेज एक महिन्याच्या कालावधी करिता देण्यात येऊन त्याचे वितरण इ पॉस प्रणाली द्वारे करण्यात येईल यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख देखील मान्यता देण्यात आली आहे
याशिवाय वस्तूंचा संच दिवाळीपूर्वीच वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये यासाठी खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याचे सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले