“महाराष्ट्रातील वातावरण धर्माच्या ,जातीच्या नावावर खराब करण्याचा काही राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहे.”, असंही बोलून दाखवलं आहे.
शिवसेना ( Shivsena ) नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आज माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पक्षावर ( BJP ) निशाणा साधला. तसेच, महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं देखील बोलून दाखवलं. याशिवाय, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray ) यांनी वर्षा या निवास्थानी घेतलेल्या बैठकीबाबत देखील त्यांनी माहिती दिली.
मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील
“आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तीक असतं. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील.” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले.