सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण पेटलेले आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड प्रकरण असो की मंत्री अब्दुल सत्तार प्रकरण असो महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांत सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या बैठकीत नेमके काय घडले? यातील माहिती काही सूत्रांच्या आधारे समोर आली आहे. या बैठकीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणाचा मुद्दा चर्चेला आला होता, असं सांगितलं जातंय. तसेच मंत्रिमंडळ विस्तार बाबत देखील चर्चा सुरु होती असे सांगितलं जातंय.
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. अनेक आमदार नाराज असल्याने आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे याची चर्चा झाली.
तसेच ठाण्यात गेल्या चार दिवसांपासून राजकारण तापलंय. आधी विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरण आणि त्यानंतर विनयभंगाचा आरोप यामुळे वाद उफाळून आला आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी नेमकी काय चर्चा केली, यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे.